News Flash

पिंपरी-चिंचवड: भरदिवसा ५० तोळे सोन्याचे दागिने लुटले

पिंपरीच्या मुख्य चौकात ही घटना घडली

प्रातिनिधीक छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी दहाच्या सुमारास दोन अज्ञातांनी व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. २ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम आणि ५० तोळे सोन्याचे (मिक्स) दागिने घेऊन अज्ञात दुचाकीस्वारांनी पोबारा केला. दरम्यान, आरोपींचा शोध पिंपरी पोलीस आणि गुन्हे शाखा क्रमांक एकचे अधिकारी घेत आहेत. रवी मेहता (७१) असे व्यापाऱ्याचे नाव आहे. या घटनेमध्ये त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे.

पिंपरीच्या मुख्य चौकात एका व्यापाऱ्याला अज्ञात दोघांनी भरदिवसा लुटल्याचा प्रकार घडला. रवी मेहता हे मूळ पंजाब येथील आहेत. मेहता हे सोन्याचे आणि चांदीचे दागिने परराज्यात नेऊन विकतात. पिंपरी-चिंचवड शहरात रात्री मुक्कामी आले होते.

सकाळी दहाच्या सुमारास २ लाख ८० रोख रक्कम आणि ५० तोळे सोन्याचे (मिक्स) दागिने घेऊन ते चिंचवडला जाणार होते. रवी मेहता पायी पिंपरी चौकात जात होते. तेव्हा, दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी त्यांच्या हातातील सुटकेस हिसकावली. यावेळी मेहता यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ते काही अंतरावर फरफटत गेले. यात त्यांच्या हाताला मुका मार लागला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून अज्ञात चोरांचा पिंपरी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, भर दिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 2:54 pm

Web Title: pimpri chinchwad pune thief stole 50 tola gold police investigation going on jud 87
Next Stories
1 शब्द न पाळणाऱ्यांशी संघर्ष केलेले मुख्यमंत्री ठाकरे शब्द पाळतील – शरद पवार
2 शरद पवारांमुळे कमीत कमी आमदारांमध्ये सरकार स्थापन करण्याचा चमत्कार – उद्धव ठाकरे
3 शेतकऱ्याच्या आयुष्याचं चिपाड होता कामा नये – उद्धव ठाकरे
Just Now!
X