News Flash

करोनाच्या भीतीने पिंपरीकर म्हणत आहेत ‘गड्या आपला गाव बरा!’

दोन दिवसांपासून शुकशुकाट असणाऱ्या खासगी बस चे बुकिंग फुल

करोनाचे रुग्ण पुण्यात सर्वाधिक आढळले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील करोनाच्या रुग्णांची संख्या १५ वर पोहचली आहे. त्यामुळे पिंपरीकर गड्या आपला गाव बरा असं म्हणत आहेत. अनेकांनी गावाला जाण्याचा पर्याय निवडला आहे.

करोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव गावी जाणे पसंत केले आहे. त्यात मध्यरात्री पासून अनेक महत्वाची ठिकाणं बंद केल्याने गावाकडे जाणाऱ्या व्यक्तींची संख्या देखील वाढली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खासगी बस मध्ये प्रवाशी नसल्याने शुकशुकाट दिसत होता. परंतु सुट्टी जाहीर होताच आज खासगी बस चे ऑनलाईन बुकिंग फुल झालेले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योग नगरी म्हणून ओळखल जातं. शहरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कष्टकरी नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. शहरात आठ जणांना करोना विषाणू ची बाधा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यात शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या ठिकाणे, शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर ज्यांच्या मनात करोना विषयी भीती होती त्यांनी थेट गावाकडे जाणे पसंद केले आहे. खासगी बस चे रात्री पासून दोनशे रुपयांची तिकीट देखील वाढले आहे. ग्रामीण भागात जाणाऱ्या व्यक्तींची मोठी संख्या असल्याचे ट्रॅव्हल्स चालक शंकर घुबे सांगतात. नागरिकांच्या मनात करोना ची भीती असल्याने अनेक नागरिक हे ऑनलाईन बुकिंग चा पर्याय निवडत आहेत अस ही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 10:12 am

Web Title: pimpri people choose to travel their native place to avoid corona virus scj 81 kjp 91
Next Stories
1 छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल
2 पिंपरी-चिंचवडमध्ये ८ तर पुण्यात ७ जण करोना पॉझिटिव्ह; एकूण आकडा १५ वर
3 पारधी मुलांच्या आश्रमशाळा वास्तूसाठी पुण्यातील युवकांची धडपड
Just Now!
X