पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य व्यक्तीपासून असाधारण व्यक्ती बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मेहनत घेऊन या पदापर्यंत पोहोचले आहे. ते आपल्या देशाची शान असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पुण्यात सायकल रॅलीच्या कार्यक्रमाप्रसंगी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीची राणी पुतळा या दरम्यान पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपाच्या महिला राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि सायकलपटू उपस्थिती होते.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देश विदेशातील नागरिकांनी प्रतिसाद देत योग दिवस साजरा केला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.