News Flash

तळेगावात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

रात्री पत्नीशी त्यांचे मोबाईलवर बोलणे झाले होते.

पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण लांबकाने

तळेगाव येथे राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संजय लक्ष्मण लांबकाने (वय ४२) असं या पोलीस कर्मचार्याचे नाव असून ते देहूरोड पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. शिरुर येथील त्यांच्या इनामगावला गेले होते. त्यानंतर रविवारी तळेगाव येथे ते एकटे परत आले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पत्नीशी त्यांचे मोबाईलवर बोलणे देखील झाले होते. त्यानंतर त्यांनी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ते तळेगाव येथील गोविंद आपर्टमेंट येथे राहात होते. हा सर्व प्रकार बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास लांबकाने यांचे कुटुंबिय शिरूर येथून परत आल्यानंतर उघडकीस आला. दरवाजा वाजवल्यानंतर घराच्या आतून प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबियांनी तळेगाव पोलिसांना याची माहिती दिली. संजय लांबकाने हे पोलीस कर्मचारी सततच्या आजारपणामुळे  नेहमीच रजेवर असायचे. आजरपणामुळेच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलेल असावे, अशी शक्यता देहूरोड पोलिसांनी वर्तवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 3:58 pm

Web Title: police constable suicide in talegaon pune
Next Stories
1 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. नितीन करमाळकर
2 पुण्यात अभियंता तरुणीची आत्महत्या, प्रेमसंबंधातून जीवन संपवले?
3 पाऊस आला छोटा, विजेचा खेळखंडोबा मोठा!
Just Now!
X