28 October 2020

News Flash

किरकोळ वादातून तरूणाचे होणाऱ्या पत्नीवर चाकूने वार

हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला आहे.

प्रतिनिधीक छायाचित्र

पुण्यातील गणेश पेठ येथे एका तरूणाने किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात आपल्या होणार्‍या पत्नीवर आणि तिच्या आईवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला. तर तिची आई गंभीर जखमी असल्याची माहिती फरासखाना पोलिसांनी दिली.

नाझनीन सादिक शेख या तरुणीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर तिच्या आई हमीदा सादिक शेख या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेतील आरोपी शरीफ रझाक शेख याला अटक करण्यात आली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पेठ परिसरात हमीदा सादिक शेख या त्यांच्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास आहेत.

नाझनीन या त्यांच्या मुलीचा शरीफ शेख या तरुणासोबत विवाह होणार होता. मात्र, मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांच्यात अचानक वाद झाला. या दरम्यान शरीफ शेख याने नाझनीन आणि हमीदा यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात नाझनीन हिचा मृत्यू झाला. तर तिच्या आई हमीदा यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या दोघींवर हल्ला करणार्‍या आरोपी शरीफ याला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 7:13 pm

Web Title: pune crime minor debate man killed a girl mother injured jud 87
Next Stories
1 पोलिसांनी वाचवले गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण
2 पुणे – दुर्दैवी ! वाढदिवशीच त्याला गाठले मृत्यूने
3 पुणे – त्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या झाल्याचं निष्पन्न
Just Now!
X