News Flash

देहूगावमध्ये गुन्हेगाराचा अज्ञात टोळक्याने कोयत्याने वार करून केला खून

हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे देहूरोड पोलिसांनी सांगितले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना देहूगावमध्ये घडली आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास तीन ते चार जणांच्या अज्ञात टोळक्याने सराईत गुन्हेगार शंकर दत्तात्रय बाळसराफ याच्यावर कोयत्याने वार केले यात त्याचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शंकर हा नुकताच कारागृहातून सुटून आलेला गुन्हेगार आहे. त्याने एकाला गंभीर जखमी केले होते. त्यामध्ये त्याला कारागृहात जावे लागले होते. आज संध्याकाळी तो देहूगावमध्ये आला होता. त्यावेळी त्याच्यावर अज्ञात तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेमुळे राज्यातून दाखल झालेले वारकरी मात्र भीतीच्या सावटाखाली आहेत. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे देहूरोड पोलिसांनी सांगितले आहे. घटनेचा अधिक तपास सुरु असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 10:04 pm

Web Title: pune criminal murdered by an unknown gang of criminals abn 97
Next Stories
1 सरकार प्रकाश शेडेकर यांच्या पाठिशी, चंद्रकांत पाटील यांनी घेतली कुटुंबाची भेट
2 पुणे: जवानाने रायफल मधून स्वत:वर गोळया झाडून केली आत्महत्या
3 दाभोलकर हत्याप्रकरणी संजीव पुनाळेकरांना जामीन मंजूर
Just Now!
X