News Flash

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन?; पुढील आठ दिवस ठरवणार पुणेकरांचं भविष्य

नियंत्रित निर्बंधाची चाचपणी होणार

(संग्रहित छायाचित्र)

पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सर्वाधिक रुग्णसंख्या होती. सध्याची करोनाची लाट पाहता ही रुग्णसंख्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत निम्म्यापर्यंत जाईल, असा निष्कर्ष भारतीय विज्ञा शिक्षण आणि संशोधन संसख्या (आयसर) आणि टाटा कन्सल्ट्सी सर्व्हिसस (टीसीएस) या संस्थांनी केलेल्या पाहणीतून सोर आला आहे. ही रुग्णसंख्या वाढू द्यायची नसल्यास काही उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत शास्त्रोक्त विश्लेषण व अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या आठ दिवसांमध्ये सरसकट टाळेबंदीऐवजी नियंत्रित मात्र, कोणत्या प्रकारचे निर्बंध लागू करायचे, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.

सौरभ राव म्हणाले की, पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा का वाढत आहे?, याबाबत अभ्यास करण्याची विनंती प्रशासनाने आयसर आणि टीसीएस या संस्थांना केली होती. त्यानुसार या संस्थांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तलयात शुक्रवारी सादरीकरण केले. त्यामध्ये सध्याच्या लाटेनुसार गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आसलेल्या सर्वोच्च रुग्णसंख्येच्या तुलनेत ५० टक्के रुग्णसंख्या होण्याची शक्यता वर्तवली आहे.

त्यावर आगामी काळात ही संख्या वाढू नये म्हणून कोणकोणत्या प्रतबंधात्मक उपाययोजना (निर्बंध) करता येतील, याबाबत दोन्ही संस्थाना शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण, अभ्यास कर्णयास सांगितले आहे. या संस्थांनी त्याकरिता आठ दिवसांच्या कालावधी मागितला असून पुढील आठवड्यात याबाबत सादरीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, दोन्ही संस्थांनी केलेल्या सादरीकरणाची माहिती पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठकीत सादर केली जाणार आहे. त्यांच्याशी चर्चा करुण कोणत्या प्रकारचे निर्बंध पुण्यात लागू करायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही राव यांनी सांगितले.

सरसकट टाळेबंदीऐवजी नियंत्रित निर्बंध –
शाळा, महाविद्यालये, अभ्यासिका ठरावीक कालावधीसाठी बंद ठेवणे, हॉटेल, रेस्टॉरंट आणि मद्यालये या ठिकाणीची केवळ पार्सल सेवा सुरु ठेवणे, विवाह सोहळे दोन महिन्यांसाठी बंद ठेवणे यासारखे निर्बंध लागू केल्यास कितपत रुग्णसंख्या आटोक्यात राहील, याबाबत टीसीएस, आयसर यांच्याकडून सादरीकरण केले जाणार आहे. या संस्थांच्या अहवालानुसार आठ दिवसांनी सरसकट टाळेबंदीऐवजी नियंत्रित निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे, असेही विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 6:07 pm

Web Title: pune lockdown decision in 7 days ajit pawar nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुणे पोलिसांनी जप्त केलेली ३० पेक्षा अधिक वाहनं जळून खाक
2 पुणे : संजय राठोडांवर कारवाई करत नाही तोपर्यंत…; भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा
3 उद्योगांना साह्य ही सरकारची जबाबदारी
Just Now!
X