पतीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला सर्व जबाबदारी खांद्यावर आल्याने पत्नीने कुटुंबाचा गाडा चालवायला सुरुवात केली. मात्र, करायचं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर होतो. दोन मुलं त्यांच्या पोटापाण्याचाही प्रश्न त्यांना भेडसावत होता. इतकंच नाही तर मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचाही प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे आपली मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्या माऊलीने डसबीन बॅग विकण्याचा निर्णय घेतला. तरीही दोन्ही मुलांना शिक्षण देऊ शकत नसल्याची खंत त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना व्यक्त केली. वैशाली सुनील भोसले अस या महिलेचे नाव आहे.

वैशाली या पिंपरी-चिंचवडमध्ये राहण्यास असून त्यांचा दिनक्रम हा सकाळी नाष्टा करायचा आणि लवकरात लवकर औंध येथील सिग्नलवर जाऊन थांबायचं. येणाऱ्या वाहनचालकांना विनवणी करून डसबिन बॅग विकायची. यातूनच मिळणाऱ्या पैशांमधून त्या आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. डसबिन बॅग विकून महिन्याकाठी जास्तीतजास्त ६ हजार रुपये वैशाली यांना मिळतात. त्यातील चार हजार हे घरभाडे असून उरलेल्या पैशांमध्ये घर चालवतात. यामुळे त्यांना मुलांना शिक्षण देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. दहा बाय दहाच्या खोलीत गेले काही वर्षे त्या आपल्या मुलांसह राहात आहेत. जेव्हा वैशाली यांचे पती होते तेव्हा मुलं चांगल्या शाळेत शिक्षण घेत होती. परंतु, त्यांच निधन होताच मुलांच्या शिक्षणावरही याचा परिणाम झाला आणि त्यांची शाळा सुटली. जवळचे सर्व जणही परके झाले असं ही त्यांनी सांगितलं. अशा वेळी सामाजिक कार्यकर्त्या अदिती निकम यांनी धीर देत पाठबळ दिलं.

वैशाली यांना डसबिन बॅग विक्रीतून काहीच पैसे मिळतात. त्यामुळे त्यांनी इतर ठिकाणी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, गरिबी अवस्था पाहून त्यांना कोणी नोकरी दिली नाही असंही त्यांनी सांगितलं. मुलांना शाळा शिकवण्याची परिस्थिती नाही. त्यांना शाळेत शिकवण्यासाठी अतोनात त्या प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना अपयश येत आहे. मुलांची शाळा सुटल्याने मुलांवरही आईला मदत म्हणून ट्रॅफिक सिग्नवर डसबिन बॅग विक्री करण्याची वेळ आली आहे.