कुख्यात गुंड गजानन मारणे याची नुकतीच तळोजा कारागृहातून सुटका झाली आहे. जेलमधून सुटल्यानंतर पुणे-मुंबई द्रुतगतीमार्ग उर्से टोल नाका येथे गर्दी जमवून दहशत पसरवल्याप्रकरणी त्याच्यासह इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक धायगुडे यांनी फिर्याद दिली आहे.

धक्कादायक! कुख्यात गुंडाची तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणुक; सोबत ३०० चारचाकी गाड्यांचा ताफा

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
attack on college girl failed after the woman started screaming
शाब्बास! महिलेच्या प्रसंगावधानामुळे तरुणीवरील हल्ल्याचा प्रयत्न फसला…
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी तळोजा कारागृहातून गुंड गजनन मारणे याची सुटका झाली. त्याचे स्वागत करण्यासाठी ३०० पेक्षा अधिक वाहनं आणि तरुण एकवटले होते. दरम्यान, तळोजा कारागृह ते पुणे यादरम्यान शक्तीप्रदर्शन करत मारणे याच्या साथीदारांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लावल्या होत्या. त्याचदरम्यान, द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे फूड मॉलजवळ मारणे याच्यासह सर्व कार्यकर्ते थांबले होते. त्यांनी आरडाओरडा करत बेकायदेशीर गर्दी जमवून फटाके वाजवले. तसंच, ड्रोनने चित्रीकरण करत दहशतीचं वातावरण निर्मिती केल्याने मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण –
गजानन मारणे हा खुनाच्या प्रकरणात तळोजा कारागृहात होता. मात्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्याने समर्थकांनी कारागृह ते पुण्यापर्यंत ३०० चारचाकी वाहनांचा ताफा सोबत घेऊन त्याचं जंगी स्वागत केलं.

पुण्यात गेल्या काही वर्षात टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर अनेक गुंडांवर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करत कारागृहात रवानगी केली होती. याचदरम्यान अमोल बधे, पप्पू गावडे आणि आणखी एका हत्येप्रकरणी गुंड गजानन मारणे याची मोक्काअंतर्गत कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या खुनातून गजानन मारणेची निर्दोष मुक्तता झाल्यावर तळोजा कारागृहाबाहेर त्याचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जवळपास ३०० हून अधिक चारचाकी वाहने तिथे होती. त्यानंतर कारागृह ते थेट पुण्यापर्यंत या गाड्या घेऊन घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली.