News Flash

राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्याची घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी कलंक – अजित पवार

घटनेचा सर्वच स्तरातून निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्याच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार निंदनीय असून निवडणुका आल्या आकी काही संघटना असे कृत्य करतात असा आरोप त्यांनी केला आहे. राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणे ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

राम गणेश गडकरी यांच्या पुतळा हटवण्याच्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. या घटनेवर अजित पवार म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्रात घडलेली ही घटना काळीमा फासणारी आहे.या घटनेचा मी निषेध करतो असे त्यांनी सांगितले.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जंगली महाराज रोडवर संभाजी उद्यान आहे. मुठा नदी किनारी वसलेल्या या उद्यानात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा आहे. १९६२ मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा पुतळा होता.  राम गणेश गडकरी स्मारक समितीने पुणे महापालिकेला हा पुतळा भेट म्हणून देण्यात आला होता.  मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला. हा पुतळा मुठा नदीत फेकण्यात आला होता. मंगळवारी सकाळी उद्यान उघडल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. पुतळा हटवण्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.  पोलिसांनी पुतळा पाडणा-या चार संशयितांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 5:16 pm

Web Title: ram ganesh gadkari statue removed ajit pawar condems incidents
Next Stories
1 धर्माच्या नावाने मते मागणे बेकायदा हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्वाचा- मेधा पाटकर
2 राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा उभारणार – पुणे महापौर
3 मुख्यमंत्री फडणवीस नुसतीच स्वप्ने दाखवतात, अजित पवारांची टीका
Just Now!
X