News Flash

शिक्षक भरती प्रक्रियेत १९६ उमदेवारांची निवड

निवड झालेल्या शिक्षकांची यादी संके तस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. 

प्रतिनिधिक छायाचित्र

 

पुणे : शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र संकेतस्थळाद्वारे नववी ते बारावीच्या वर्गांसाठी १९६ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शिक्षकांची यादी संके तस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.  या पूर्वी निवडीसाठी प्रसिद्ध केलेल्या पात्र उमेदवारांच्या यादीवेळी संबंधित प्रवर्गाचे आरक्षण आणि उपलब्ध विषय यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षेत (टेट) गुण असूनही काही उमेदवारांच्या माहितीमधील तांत्रिक अडचणीमुळे त्यांची नियुक्तीसाठी निवड झाली नव्हती. अशा उमेदवारांसाठी  ही फेरी घेण्यात आली. करोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवारांनी नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा. मुलाखतीसह पदभरतीबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 1:04 am

Web Title: selection of candidates in the teacher recruitment process akp 94
Next Stories
1 सीरमकडून २०० रुग्णांसाठी प्राणवायू निर्मिती
2 भारत बायोटेककडून पुण्यात लसनिर्मिती
3 शहरात करोना रुग्णसंख्या आटोक्यात; ग्रामीण भागाची चिंता मात्र कायम
Just Now!
X