नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागृती घडावी आणि भावी पिढीला सुदृढ आरोग्याचे भान लाभावे, ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याचा ‘सेवा आरोग्य फाउंडेशन’ने वसा घेतला आहे. आरोग्यवर्धन उपक्रमांतर्गत वस्त्यांमधील नागरिकांना उपचारांसाठी अर्थसाह्य़ करण्याबरोबरच समाजाच्या या घटकाच्या निरामय आरोग्यासाठी पुढे येऊन या कामाला मदत करणाऱ्यांनाही एकत्र केले जात आहे.

सुखी, निरोगी, स्वावलंबी, सुशिक्षित, सुसंस्कारित परिवार हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेल्या सेवा आरोग्य फाउंडेशनने नुकतीच कार्याची वर्षपूर्ती केली आहे. वंचित, असहाय आणि पीडित समाजाला ओंजळीत घेऊन आधार देण्याबरोबरच त्यांच्या जीवनात फुलासारखा आनंद निर्माण करू या, या उद्देशातून प्रदीप कुंटे, रवींद्र शिंगणापूरकर, श्रीवल्लभ दबडघाव, डॉ. मृणाल वर्णेकर, अनिल गुत्ती, संजीव बेंद्रे, सुधीर जवळेकर आणि दीपक अष्टपुत्रे या कार्यकारी मंडळाने कामकाजास सुरुवात केली.

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!

सध्याच्या परिस्थितीमध्ये शहरात येणारे लोंढे, ग्रामीण भागाकडे होत असलेले दुर्लक्ष, दैनंदिन जीवनातील ताणतणाव यांमधून समाज उत्तम आरोग्याकडून नवनवीन समस्यांच्या गर्तेत खेचला जात आहे. वृद्ध, गरीब, असहाय, दुर्लक्षित समाजाच्या आरोग्य समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधांच्या माहितीचा अभाव असल्याने किंवा सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे त्यांना अशा सुविधांपासून वंचित राहावे लागते. अशा स्थितीमध्ये शुद्ध सेवेच्या भावनेतून आरोग्यवर्धन उपक्रमांतर्गत विविध विषयांच्या माध्यमातून समस्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे दीपक अष्टपुत्रे यांनी सांगितले.

फाउंडेशनने राबविलेले विविध समाजोपयोगी उपक्रम

  • सात नेत्रतपासणी शिबिराद्वारे ८३६ रुग्णांची तपासणी
  • ६४ जणांवर मोतीिबदूची शस्त्रक्रिया
  • तिरळेपणा दूर करण्याची एका मुलावर शस्त्रक्रिया
  • सिंहगड रस्त्यावरील विशेष मुलांच्या शाळेत त्वचाविकार तपासणी
  • वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिरांद्वारे ५९५ महिलांची तपासणी
  • आरोग्य मैत्रिणींकडून दहा वस्त्यांमध्ये जाऊन व्याधीग्रस्तांची नोंद
  • शहरातील ६६ अभ्यासिकांमधील चार हजार विद्यार्थ्यांची तपासणी