19 March 2019

News Flash

सुशीलकुमार शिंदे यांनी सुरेश भट यांच्या आठवणी जागविल्या

मित्र म्हणजे भट साहेबांसाठी जीव की प्राण होते, मैत्री करताना त्यांनी कधीही कोणाची जातपात बघितली नाही.

यूआरएल फाउंडेशनतर्फे सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते रमण रणदिवे आणि अनिल कांबळे यांना गज़्‍ालगौरव तर ममता सिंधुताई सपकाळ यांना गज़्‍ाल उन्मेष’ पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. उदय लाड आणि सुरेशकुमार वैराळकर या वेळी उपस्थित होते.

 

ज्येष्ठ कवी सुरेश भट यांच्या अनेक गज़्‍ाल आणि कवितांचा पहिला श्रोता होण्याचे भाग्य मला लाभले. अनेकदा मध्यरात्री दूरध्वनी करून ते मला त्यांच्या रचना ऐकवत. समजले नाही तर समजावून सांगत. त्यांच्या शब्दाशब्दांमध्ये सरस्वती होती. आम्ही कितीही मोठे मंत्री झालो तरी सुरेश भट यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मोठेपण आमच्यामध्ये कधीही येऊ शकत नाही, अशा शब्दांमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गज़्‍ालसम्राट सुरेश भट यांच्या आठवणींना रविवारी उजाळा दिला.

यूआरएल फाउंडेशनतर्फे सुरेश भट यांच्या जन्मदिनानिमित्त शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी-गज़्‍ालकार रमण रणदिवे आणि अनिल कांबळे यांना गज़्‍ालगौरव पुरस्कार तर, ममता सिंधुताई सपकाळ यांना ‘गज़्‍ाल उन्मेष’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. फाउंडेशनचे संस्थापक उदय लाड या वेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, सुरेश भट हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते, त्यामुळे अगदी अपरात्रीही आपली गज़्‍ाल किंवा कविता ऐकवण्यासाठी ते मला दूरध्वनी करत असत. मी केंद्रात मंत्री झाल्यानंतरही त्यामध्ये खंड पडला नाही.

मित्र म्हणजे भट साहेबांसाठी जीव की प्राण होते, मैत्री करताना त्यांनी कधीही कोणाची जातपात बघितली नाही. अशा मैत्रीमुळेच जेथे अक्षरे पोहोचायची शक्यता नसे तेथे गज़्‍ाल नेऊन पोहोचवण्याचे काम सुरेश भट यांनी केले.

यावेळी झालेल्या गज़्‍ाल मुशायऱ्यामध्ये प्रमोद खराडे, सदानंद बेंद्रे, अमित वाघ, सतीश दराडे, सुधीर मुळीक, वैभव देशमुख, राधा भावे आणि ममता सपकाळ यांनी गज़्‍ाल सादर केल्या. सुरेशकुमार वैराळकर यांनी सूत्रसंचालन केले.

First Published on April 16, 2018 5:58 am

Web Title: sushilkumar shinde remember memories of suresh bhat