News Flash

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड

पुणे-मुंबई प्रवास करत असताना प्रवाशांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे पोलिसांनी सांगितले.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला तळेगाव पोलिसांनी अटक केली. २० ते २६ एप्रिल दरम्यान या टोळीने एक्स्प्रेस वेवर तब्बल १० ते १२ प्रवाशांना लुबाडले होते. याप्रकरणी पोलिसांनी पप्पू शिवाजी कांबळे, सनी गौतम घाडगे यांना निगडी परिसरातून अटक केली असून तिसरा आरोपी फरार असल्याचे तळेगाव पोलिसांनी सांगितले आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रताप खिमाजी भानुशाली आणि त्यांचा भाऊ हे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी हिंजवडी भुजबळ चौक येथे बसची वाट पाहात थांबले होते. तेवढ्यात एका कॅब चालकाने प्रत्येकी ३०० रुपयांमध्ये अंधेरीपर्यंत सोडतो असे सांगितले. गाडीमध्ये पाठीमागील सीटवर दोघे जण अगोदरच बसलेले होते. भानुशाली यांनी त्यांच्याकडील रोख रक्कम २० हजार रुपये असलेली बॅग डिक्कीत ठेवली आणि पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झाला. लोढा स्कीमच्या पुढे जाताच कॅब चालक व त्याच्या साथीदाराने प्रताप आणि त्यांच्या भावाला चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू चोरल्या. यानंतर त्यांना मारहाण करून गाडीच्या खाली ढकलून दिले.

प्रताप यांनी तळेगाव पोलिसांकडे याप्रकरणी फिर्याद दिली. त्याप्रमाणे तळेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. मोबाईलच्या तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या. या गुन्ह्यातील आरोपी निगडीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. अद्याप एक आरोपी फरार असून दोघे जण अटक आहेत. २० ते २६ एप्रिल रोजी पप्पू आणि सनीसह इतर एक आरोपीने डांगे चौक, वाकड ब्रिज, देहूरोड,सिम्बॉसिस कॉलेज, किवळे या परिसरातून तब्बल दहा ते बारा प्रवाशांना पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर प्रवास करत असताना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची कबुली दिली आहे. यामुळे पुणे-मुंबई प्रवास करत असताना प्रवाशांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 5:24 pm

Web Title: talegaon police arrest gang robbing passengers on mumbai pune express way
Next Stories
1 कंपवातावरील उपचारासाठी नृत्याचे धडे!
2 पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा
3 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची १०९व्या स्थानी झेप
Just Now!
X