शिवी का दिली याचा जाब विचारला म्हणून चिडलेल्या व्यक्तीने डोक्यात बिअरची बाटली घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जयकुमार कृष्णदेव त्रिंबके वय-२९ यांनी समीर सुर्यकुंज याच्या विरोधात भोसरी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी जयकुमार कृष्णदेव त्रिंबके (वय-२९ रा.सरिताकुंज सोसायटी,कासारवाडी पुणे) यांच्या मामाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवण्यात आली होती. त्या पार्टीत समीर सुर्यकुंज आणि फिर्यादी जयकुमार कृष्णदेव त्रिंबके हे सहभागी झाले होते. पार्टीमध्ये मद्यपान झाले,आणि याच नशेत समीर सुर्यकुंज याने त्रिंबके यांना शिवी दिली. जयकुमार कृष्णदेव त्रिंबके यांनी मला ‘शिवी का दिली’ असा जाब विचारला असता समीर सुर्यकुंज याने थेट डोक्यात बिअरची बाटली घातली आणि मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेत त्रिंबके जखमी झाले होते, रुग्णालयात उपचारानंतर त्यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे.
हा सर्व प्रकार कासारवाडीतील द्वारकानगरी इमारतीच्या टेरेसवर घडला. याप्रकरणी भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करत आहेत. अद्याप आरोपीला ताब्यात घेण्यात आले नाही.
First Published on April 16, 2018 10:04 am
No Comments.