पुण्यातील हिंगणे खुर्द येथील शेततळ्यात पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची माहिती अग्निशामक विभागाकडून देण्यात आली. विनोद विठ्ठल बर्गे (वय-१५) असे मृत मुलाचे नाव आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणे खुर्द येथील साईनगर जवळील डोंगर परिसरात जनावरांसाठी शेततळ आहे. त्या ठिकाणी सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विनोद बर्गे  पोहण्यास गेला होता, त्यावेळी तो बुडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी धाव घेतली आणि तासाभरानंतर मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तसेच, त्या मुलासोबत किती जण होते? नेमका तो कसा काय बुडाला? याबाबत चौकशी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.