28 September 2020

News Flash

डुक्कराचं मांस खाण्याची जबरदस्ती करत विवाहितेला जीवे मारण्याची धमकी

दिराने केला विनयभंग; देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र

शिवीगाळ करून डुक्कराचं मांस खाण्यासाठी जबरदस्ती करून एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तसेच दिराने शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली आहे. याप्रकरणी पती, सासू आणि दिराविरोधात देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ११ जून २०२० ते ७ ऑगस्ट २०२० पर्यंत संबंधित पती, सासू आणि दिराने विविध कारणावरून पीडित महिलेचा छळ केला असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. आरोपींनी शिवीगाळ करुन पीडित महिलेला डुक्कराचं मटण खाण्यासाठी जबरदस्ती करुन जीवे मारण्याची धमकी दिली तसेच माहेरहून गाडी आणण्यासाठी सक्ती करीत मानसिक आणि शाररिक छळ केला. शिवाय, पतीने पट्टयाने मारहाण करून दुखापत केली आणि दिरानं शिवीगाळ करुन शारिरिक संबंधाची मागणी करुन विनयभंग केला असं पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.

याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अद्याप अटक झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 1:50 pm

Web Title: threatening to kill a married woman by forcing her to eat pork aau 85 kjp 91
Next Stories
1 उच्चशिक्षित डॉक्टरची पेटीएमद्वारे फसवणूक; गुन्हा दाखल
2 मुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती
3 प्राध्यापकांना निम्मे वेतन; राम मंदिरासाठी मात्र २१ कोटी
Just Now!
X