News Flash

पुणेकरांनो सावधान! इंग्लंडवरुन आलेला व्यक्ती आढळला करोना पॉझिटिव्ह

खबरदारी घेण्यास सुरूवात

(संग्रहित छायाचित्र)

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात इंग्लंडमधून प्रवास करून परतलेल्या पुण्यातील एका व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य आधिकाऱ्यानं दिली आहे. त्या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर अशून, त्याची करोनाच्या विषाणूची स्ट्रेन इंग्लंडमध्ये उद्रेक झालेल्या विषाणूंशी मिळती-जुळती आहे का, हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे महानगर पालिकेचे सहायक मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.

१३ डिसेंबर रोजी ती व्यक्ती पुण्यात परतली होती. १७ तारखेला त्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्या तरुणाला करोनाच्या नव्या ‘स्ट्रेन’ची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) ‘जेनेटिक सिक्वेन्सिंग’ चाचणी करण्यात येणार असल्याचेही वावरे म्हणाले.

२५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान युरोप आणि मध्यपूर्व आशियातून राज्यात ५४४ नागरिक आले आहेत. त्यापैकी ३०० प्रवासी पुण्यातील असून, त्यांचा शोध लागला आहे. या सर्वांना घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वावरे यांनी दिली.

ब्रिटनमध्ये करोनाचे नवीन दोन प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे सगळ्या देशांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनमधून येणारी विमानंही थांबवण्यात आली आहे. मात्र, ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या प्रकाराचं संक्रमण सुरू असतानाच पुण्यात परतलेल्या एका व्यक्तीमुळे खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाला कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याने घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

ब्रिटनमधील स्थिती कशी आहे?

लंडन आणि दक्षिण आणि पूर्व इंग्लंडमध्ये करोनाच्या नव्या प्रकाराचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जेनेटिक कोडचा अभ्यास करणाऱ्या नेक्सस्ट्रेन या संस्थेच्या आकडेवारी असं दिसून येतं की डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियामध्येही हा व्हायरस आढळून आला आहे. नेदरलँडमध्येही करोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतही व्हायरसच्या या नव्या प्रकाराशी मिळता जुळता एक व्हायरस आढळून आला आहे. पण, त्याचा ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या व्हायरसशी संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हा व्हायरसही ब्रिटनमधून आढळून आला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये करोनाच्या नवीन दोन प्रकाराचं संक्रमण वाढताना दिसत आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 10:30 am

Web Title: uk returnee found coronavirus positive in pune nck 90
Next Stories
1 “बायडन हे तर पूर्वीचे भिडे, ते पुण्यातच होते”, गिरीश बापटांची टोलेबाजी
2 रुपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी
3 करोना संशोधनाबाबत जागतिक स्तरावर देश पिछाडीवर
Just Now!
X