आयएनटीपीएच्या शास्त्रज्ञांचे संशोधन

पुणे : सूर्याच्या प्रभामंडलातून तोफगोळ्यासदृश (फायरबॉल) होणाऱ्या उत्सर्जनाचा पल्सारच्या साहाय्याने उलगडा झाला आहे. त्यामुळे अंतराळ हवामानाच्या पल्सारवरील परिणामाची पहिल्यांदाच नोंद झाली आहे. अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (यूजीएमआरटी) साहाय्याने खगोलशास्त्रज्ञांनी हे संशोधन के ले आहे.

इंडियन पल्सार टायमिंग अ‍ॅरे (आयएनपीटीए) हा वीस खगोलशास्त्रज्ञांचा अभ्यास गट विश्वातील सर्वात अचूक घडय़ाळ ‘पल्सार’चा अभ्यास करत आहे. या गटात राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी के ंद्रातील (एनसीआरए) डॉ. भालचंद्र जोशी यांच्यासह मंजिरी बागची, गोपा कु मार, कृष्ण कु मार, टी. प्रभू आदी शास्त्रज्ञांचा समावेश आहे. लायगो आणि व्हर्गो या दुर्बिणींचा वापर करून गुरुत्वीय लहरी शोधणे शक्य आहे. मात्र कमी वारंवारितेच्या गुरुत्वीय लहरी पल्सार घडय़ाळ काळातील बदलांचा वापर करून शोधता येऊ शकतात. गुरुत्वीय लहरी शोधण्यासाठी पल्सारपासून निघणाऱ्या रेडिओ लहरींच्या आगमनाचा काळ दहा नॅनोसेकं द इतक्या अचूकतेने ठरवणे आवश्यक आहे. यूजीएमआरटीच्या ३०० ते ४०० मेगाहर्ट्झपर्यंतच्या या लहरींची नोंद घेण्याच्या क्षमतेमुळे खगोलशास्त्रज्ञांना या लहरींमधील बदल टिपता येऊ शकतात. त्यामुळेच शास्त्रज्ञांना २०१९मध्ये सौर स्फोटाचा परिणाम शोधता आला होता. त्यानंतर त्याच्या विश्लेषणातून शास्त्रज्ञांना पल्सार वेळेचा वापर करून तोफगोळ्यासदृश उत्सर्जनाचा शोध घेण्यात यश आल्याची माहिती एनसीआरएकडून (एनसीआरए) प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.

सूर्याच्या आंतरिक क्रियांमुळे त्याचे चुंबकीय क्षेत्र फिरून मोठय़ा प्रमाणात स्फोट होतात. कोरोनल मास इजेक्शन नावाचे हे उत्सर्जन भारीत कण असलेल्या सौर वादळासह अवकाशात प्रवास करतात. असा स्फोट तोफे तून फे कलेल्या गोळ्याप्रमाणे भासतो. सौर वादळाशी हे भारीत कण पृथ्वी आणि सूर्यातील इलेक्ट्रॉन्सची घनता वाढवू शकतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील माध्यमांच्या घटकांतील बदल पल्सारपासून कालावधी मोजण्याच्या अचूकतेवर परिणाम करतात. आयएनपीटीएच्या शास्त्रज्ञांना यूजीएमआरटीचा वापर करून सूर्याच्या पृष्ठभागावर कोरोनल मास इजेक्शन झाल्याचे अंतराळातील उपग्रहांमुळे कळले होते. या उत्सर्जनातील घटकांमुळे तयार झालेला बुडबुडा सौर वाऱ्याने संकु चित के ला. त्यामुळे पल्सारच्या दर्शनी भागात दाट आयन द्रायू (प्लाझ्मा) तयार झाला. त्यानंतर पल्सार संकु चित माध्यमातून गेल्यामुळे पल्सार संके तांच्या अतिरिक्त विलंबाला कारणीभूत झाला. त्यामुळे पल्सारवरील अंतराळ हवामानाचा प्रभाव पहिल्यांदाच नोंदवला गेला आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.