नरकचतुर्दशीच्या पहाटे हव्याहव्याशा वाटणाऱ्या थंडीत केले जाणारे अभ्यंग स्नान म्हणजे अनेकांची दिवाळीतील सर्वात आवडती गोष्ट! या वर्षी मात्र दिवाळी सुरू झाली तरी ही गुलाबी थंडी काही अनुभवायला मिळत नाही. दर वर्षी या दिवसांत असणाऱ्या तापमानाच्या सर्वसाधारण आकडय़ांनुसार सध्याचे तापमान अधिक राहिले असून अजूनही कमी न झालेले ढगाळ वातावरण हे त्याचे एक कारण असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.
दिवाळी पहाट आणि थंडी हे एक समीकरण आहे. ही थंडी कडाक्याची नसली तरी दिवाळी सुरू झाल्याची जाणीव देणारी गुलाबी थंडी या दिवसांत नेहमी बघायला मिळते. नरकचतुर्दशीला पहाटे उठून गरम पाण्याने केलेले अभ्यंगस्नान, हव्याशा थंड हवेत सकाळी लवकर केला जाणारा फराळ आणि तशाच वातावरणात सहकुटुंब घराबाहेर पडणे हा बहुतेक जणांचा दिवाळीतील नित्यक्रम असतो. यंदा मात्र दिवाळी सुरू झाल्यानंतरही थंडीचा मागमूस दिसत नाही. सध्याची तापमानाची स्थिती पाहता ही दिवाळी गुलाबी थंडीविनाच जाणार असल्याची शक्यता असून थंडी सुरू होण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
पुण्यातील सध्याचे तापमान पाहता सर्वसाधारण किमान तापमान १६ ते १७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले आहे. सध्या तरी ते लगेच कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दरवर्षी दिवाळीत दिसणाऱ्या तापमानाच्या तुलनेत सध्याचे तापमान साधारणत: २ अंश सेल्सियसने अधिक आहे. ढगाळ वातावरण ओसरल्यावर नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरूवातीला हिवाळ्याला सुरूवात होऊ शकेल, असेही विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आभाळ स्वच्छ असते तेव्हा तापमान कमी व्हायला सुरूवात होते. पुण्यात मंगळवारीही हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून बुधवार, गुरूवार आणि शुक्रवारी शहराच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत तापमानही १८ ते १९ अंश सेल्सियसच्या आसपास राहू शकेल. सोमवारच्या नोंदींनुसार राज्यात आधीच्या चोवीस तासांमध्ये सर्वात कमी तापमान (१५.७ अंश सेल्सिअस) नाशिक येथे होते. तर, पुण्यात १६.१ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली होती.

temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
summer
सुसह्य उन्हाळा!
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू