मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले आव्हान हे स्वतःच मारायचे आणि स्वतः रडायचे असे आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा सांगितले आहे, कोविडचं संकट महत्वाचं आहे. त्यामुळं आमचे प्राधान्य हे सरकार पाडण्याचे नाही, असं पुन्हा पुन्हा सांगावं लागत आहे.  कोविडवरून लक्ष विचित करण्यासाठी मुख्यमंत्री मुद्दामहून असे सरकार पाडून दाखवण्याचे आव्हान करत असल्याचे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी दरेकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे आव्हान  हे स्वतःच मारायचे आणि स्वतः रडायचे असे आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा सांगितले आहे.  कोविडचं संकट महत्वाचं आहे. कोरोनामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यांच्यावर उपचार झाले पाहिजेत, त्यांना उपचाराची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकार पाडणे हे आमचे प्राधान्य नाही. हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगितलं आहे.

तसेच, कोविडची परिस्थिती हातळण्यात जे अपयश येत आहे व आरोग्य व्यवस्थेची जी दुरवस्था झाली आहे यावरू लक्ष विचलित करण्यासाठी आमचं सरकार पाडणार असं म्हणून जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत, असं देखील दरेकर यावेळी म्हणाले.