पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य शुक्रवारी दाखविण्यात आला. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.

गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. या सजावटीचे आणि गणरायाचे छायाचित्र गणेशभक्तांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले. देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला.

sangli banyan tree marathi news
सांगली: चार शतकांचा साक्षीदार असणारा वटवृक्ष कोसळला
Armed robbery Mahagaon taluka,
यवतमाळ : महागाव तालुक्यात सशस्त्र दरोडा, ३० लाख रोख व १७ तोळे सोन्याचे दागिने लुटले; महिलांना अमानुष मारहाण
only 90 warkari
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानदिनी मंदिरात एका दिंडीतील ९० वारकऱ्यांनाच प्रवेश, प्रस्थान सोहळा नियोजन बैठकीत निर्णय
Man Set Ablaze While Sleeping, Gadchiroli, challewada Village, Investigation Underway, crime news,
धक्कादायक! अंगणात झोपलेल्या व्यक्तीला अज्ञातांनी पेट्रोल टाकून पेटवले; गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त छल्लेवाडा गावातील घटना
Shani jayanti on 6th June 2024 Five Zodiac Signs Life To Take Turn
६ जूनला शनी जयंतीपासून 5 राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी; पावसाआधी बरसणार धन व सुख, तुम्ही आहात का नशीबवान?
chimney, Lakshmi Mill,
सोलापूरच्या लक्ष्मी मिलची १२५ वर्षांची जुनी चिमणी अखेर जमीनदोस्त
Attack on rickshaw driver,
डोंबिवलीत देवीचापाडा येथे गर्दुल्ल्यांचा रिक्षा चालकावर हल्ला
rare maldhok bird in solapur
सोलापुरात अतिदुर्मीळ माळढोक दर्शनाने पर्यावरणप्रेमी सुखावले ; कृत्रिम प्रजनन केंद्र कागदावरच

हेही वाचा : विकास करण्यासाठी महायुतीत, मी सत्तेला हापापलेलो नाही; सत्ता येते, सत्ता जाते – अजित पवार

मंदिरात पहाटे प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल आणि सहकाऱ्यांनी गायन सेवा अर्पण केली. सूक्त पठण आणि अभिषेक करण्यात आला. आंब्याची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.