25 September 2020

News Flash

पुण्यात आठव्या मजल्यावरुन उडी मारुन तरुणाची आत्महत्या

त्याने मद्यप्राशन केले होते. आठव्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीतून त्याने उडी मारुन आत्महत्या केली.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

लोहगाव भागातील एका सोसायटीत आठव्या मजल्यावरुन उडी मारुन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

अर्णव तुहीनेहदूर मुखोपाध्याय (वय ३८, रा. जेनीबेलिया सोसायटी, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विमाननगर पोलिसांकडून अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. अर्णव एका दूरसंचार कंपनीत नोकरीला होता. मंगळवारी रात्री त्याने मद्यप्राशन केले होते. तो आठव्या मजल्यावर राहायला आहे. सदनिकेच्या गॅलरीतून त्याने उडी मारुन आत्महत्या केली. सोसायटीतील रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अर्णवचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली.

अर्णवच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 9:34 pm

Web Title: youth suicide in pune falling from the eighth floor
Next Stories
1 पुण्यात तृतीयपंथीयांकडून भाजपाचा निषेध
2 VIDEO: पुण्यात कोंबड्याच्या खुराड्यात घुसला बिबट्या आणि…
3 मीच पुण्याचा भावी खासदार : संजय काकडे
Just Now!
X