मुव्हिंग अ‍ॅकॅडमी ऑफ मेडिसिन अँड बायोमेडिसिनतर्फे ‘लिटील सायन्टिस्ट’ उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची पहिली संशोधन परिषद घेण्यात येणार असून २५ आणि २६ जूनला ही परिषद होणार आहे.
मुव्हिंग अ‍ॅकॅडमी ऑफ मेडिसिन अँड बायोमेडिसिनतर्फे लिटील सायन्टिस्ट हा उपक्रम राबवला जातो. यामध्ये दहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी लागावी आणि संधी निर्माण व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात. संशोधन प्रकल्पाची सुरुवात करण्यापूर्वी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय चाचण्या, आजारांची प्राथमिक माहिती अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. या प्रकल्पाचे हे पाचवे वर्ष असून या प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संशोधन परिषद घेण्यात येणार आहे.
ही परिषद २५ आणि २६ जूनला पाषाण येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च (आयसर) येथे होणार आहे. या परिषदेमध्ये विद्यार्थी त्यांचे संशोधन प्रकल्प सादर करणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.