डंपर ने दुचाकीला पाठीमागून धडक दिली

पिंपरी- चिंचवड: पुन्हा एकदा डंपरने तरुणीचा जीव घेतला आहे. हिंजवडी परिसरात वारंवार डंपर च्या अपघातात तरुणीचा जीव जात आहे. तन्वी साखर अस २० वर्षीय तरुणच नाव आहे. चिंचवड येथे तन्वी फॅशन डिझायनर चा कोर्स करत होती. गेल्या महिन्यात भारती मिश्रा नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. हिंजवडीत अपघाताची मालिका सुरूच आहे.

दुपारी एक ते दीड च्या सुमारास तन्वी तिच्या वडिलांसोबत पुनावळे कोलते पाटील रस्त्याने हिंजवडीत येत होती. भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. तन्वीचे वडील बाजूला पडले तर तन्वी थेट डंपर च्या चाकाखाली आली. तन्वीचा जागीच मृत्यू झाला आहे. वडिलांच्या समोर तन्वीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेनंतर हिंजवडीमधील अवजड वाहतुकीचा प्रश्न येरणवीर आला आहे. गेल्या महिन्यात भारती मिश्रा नावाच्या महिलेचा भरधाव सिमेंट मिक्सरने धडक दिली होती. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून सतत अवजड वाहतुकीच्या हलगर्जीपणामुळे महिलांचा मृत्यू होत आहे. यावर लगाम घालणं अत्यंत गरजेचे आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.