पुण्यातील कात्रज भागातील रामभाऊ म्हाळगी शाळेत मध्यान्ह भोजनावेळी २२ विद्यार्थ्यांसह प्राचार्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुत्रांच्या माहितीनुसार, कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेत आज सकाळी साडे दहाच्या सुमारास विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत मसाले भात माध्यन्ह भोजनात देण्यात आला होता. हा भात खाल्यानंतर काही मिनिटांनी २२ मुलांसह शाळेच्या प्राचार्यांना उलट्या होण्यास सुरुवात झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत विषबाधा झालेल्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 students a teacher of rambhau mhalgi school in pune food poisoning for consuming mid day meal aau
First published on: 21-08-2019 at 14:31 IST