जून महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या पुणेकरांना गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या पावसाने झोडपून तर काढलेच, पण पावसाची सरासरीही ओलांडून तो पुढे गेला आहे. जुलैच्या १ तारखेला केवळ ४० मिलिमीटरपर्यंत हंगामातील पावसाची नोंद झाली होती. त्यात जुलैच्या सुरुवातीलाच तब्बल २५० मिलिमीटरहून अधिकची भर पडली आहे. जोरदार पावसाने पुणेकर काही प्रमाणात हैराण झाले असले, तरी धरणाक्षेत्रांत होत असलेला पाऊस आणि वाढणाऱ्या पाणीसाठ्याबाबत सामाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जूनच्या संपूर्ण महिन्यामध्ये मोसमी पावसाला पोषक वातावरण नव्हते. त्यापूर्वी पूर्वमोसमी पावसानेही शहाकडे पाठ फिरविली होती. जूनच्या १० तारखेनंतर पुणे शहर आणि परिसरात मोसमी पाऊस दाखल झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात पाऊस पडतच नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. जूनच्या संपूर्ण महिन्यामध्ये दोन ते तीन वेळेलाच शहरामध्ये पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. बहुतांश वेळेला शहरात उन्हाच्या झळाच जाणवत होत्या. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाणीसाठ्यात मोठी घट झाली होती. त्यामुळे दीर्घकाळ पाणीकपातीची टांगती तलवार पुणेकरांवर होती. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात चित्र काही प्रमाणात बदलले.

Drop in temperature in Mumbai and surrounding areas heat remains due to humidity
मुंबई आणि परिसरातील तापमानात घट, आर्द्रतेमुळे उष्मा कायम
pune house rent marathi news, pune house rent increasing marathi news
पुण्यात घरभाडे वाढता वाढता वाढे…! जाणून घ्या सर्वाधिक घरभाडे कोणत्या भागात…
rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
mumbai records hottest temprature in 10 years
मुंबईतील दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; मुंबई, ठाणेकरांची आजही होरपळ

आठ ते दहा दिवसांमध्ये तब्बल २६२ मिलिमीटर पावसाची भर –

जुलैच्या ४ तारखेला वातावरणात अचानक बदल झाला. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. जुलैच्या दुसऱ्या आठड्यामध्ये पावसाने जोर धरला. गेल्या चार ते पाच दिवसांच्या कालावधीत शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाच्या सरासरीमध्ये झपाट्याने वाढ झाली. ४ जुलैपर्यंत शहरात ४० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला नव्हता. मात्र, त्यात गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये तब्बल २६२ मिलिमीटर पावसाची भर पडली. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत उणा झालेला शहरातील पाऊस आता सरासरीपेक्षा अधिक झाला आहे.

पाषाण परिसरात सर्वाधिक पाऊस –

शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर केंद्रावर १ जूनपासून ३१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शिवाजीनगरमध्ये १४ जुलैपर्यंत पावसाची सरासरी २३५ मिलिमीटर असते. त्यानुसार हा पाऊस सरासरीच्या तुलनेत ३३ टक्क्यांनी अधिक आहे. शहरातील पाषाण केंद्रावर मात्र सर्वाधिक ३६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, लोहगाव केंद्रावर २९१ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. पुणे जिल्ह्यातही चांगल्या पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात सरासरीपेक्षा ५९ टक्के अधिक म्हणजेच ५१२ मिलिमीटर पाऊस नोंदिवला गेला.