पुणे जिल्ह्यातील वानवडीमधील महिला सुधारगृहातून ३८ महिला फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व महिलांनी वानवडी सुधारगृहाची मंगळवारी मध्यरात्री तोडफोड करून पलायन केले. महिलांनी सुधारगृह अधिकाऱयालाही मारहाण केल्याचे समजते.
दरम्यान, पळून गेलेल्या ३८ महिलांपैकी १८ महिलांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, २० महिला अद्याप फरार आहेत. यात काही बांगलादेशी महिलांचाही समावेश आहे. पोलिसांची शोध मोहिम सुरू आहे. पण या घटनेमुळे सुधारगृहातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.