पीएमपीकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मासिक पासच्या दरात सवलत जाहीर करण्यात आली असून हे सवलतीचे पास शनिवार (१७ ऑगस्ट) पासून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
शहराच्या हद्दीत प्रवास करणाऱ्यांसाठी मासिक पास १,२०० रुपयांना दिला जातो. विद्यार्थ्यांना हा पास आता ६०० रुपयांना दिला जाणार आहे. शहर हद्दीबाहेरील प्रवासासाठीच्या मासिक पासचा दर १,५०० रुपये असून हा पास विद्यार्थ्यांना ७५० रुपयांना दिला जाणार असल्याचे पीएमपीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. पीएमपीच्या पास केंद्रांवर आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरातील हे पास शनिवारपासून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 consession for pmp pass to students
First published on: 17-08-2013 at 02:39 IST