पोलीस विभागात अनेकवेळा महिला कर्मचाऱ्याकडून ८ तासाची ड्युटी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीचा विचार करत पोलीस महासंचालक यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण मधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना ८ तासाच्या ड्युटीची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार आहे. अशी माहिती पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.

यावेळी अभिनव देशमुख म्हणाले की, महिला कर्मचारी यांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळून ड्युटीवर यावे लागते. आतापर्यंत १२ तासाची ड्युटी होती. त्यामुळे महिलांसाठी ८ तासाची ड्युटी केली जावी, अशी मागणी सतत होत होती. अखेर याबाबत पोलीस महासंचालक यांच्या सूचनेनुसार पोलीस वेल्फेअरचा भाग म्हणून उद्यापासून प्रायोगिक तत्त्वावर ८ तासाच्या ड्युटीची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे ३३० महिला कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

तसेच ते पुढे म्हणाले की, येणार्‍या काळात या निर्णयाचा आढावा घेऊन, आणखी कोणत्या विभागाला सामावून घेता येईल का? याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसेच महिला कर्मचार्‍यांच्या ८ तासाच्या ड्युटीच्या निर्णयामुळे कामावर निश्चितच चांगला परिणाम होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.