नियोजित गृहप्रकल्पात पाचव्या मजल्यावर काम करणारा बांधकाम मजूर तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बाणेर भागात घडली.
रामू धनसिंग निनावत (सध्या रा. स्वराज बिल्डकाॅन, बाणेर) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. या प्रकरणी डी. के. एंटरप्रायजेस या ठेकेदार कंपनीच्या मालकासह एका अभियंत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष बिनावत (वय २५, रा. सुतारदरा, कोथरूड) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- पुणे : मंडईतील गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना अटक

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’

बाणेर भागातील नियोजित गृहप्रकल्पात पाचव्या मजल्यावर निनावत प्लास्टर काम करत होते. त्या वेळी पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने निनावत गंभीर जखमी झाले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस तपासात ठेकेदाराने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणी ठेकेदारासह अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर तपास करत आहेत.