सुरक्षारक्षकच काढत होता महिलांचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ; पुण्यातील IB गेस्ट हाऊसमधील धक्कादायक प्रकार

बाथरुमच्या खिडकीतून हे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले होते

Pune, IB Guest House, पुणे
बाथरुमच्या खिडकीतून हे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले होते

पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये महिलेचे आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाथरुमच्या खिडकीतून हे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले होते. परिचारिकेचे फोटो, व्हिडीओ काढल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण असं या आरोपी सुरक्षारक्षकाचं नाव आहे. तक्रारदार महिला गेस्ट हाऊसमधील बाथरुममध्ये दुपारी आंघोळ करत असताना आरोपी सुरक्षारक्षक अशोक चव्हाण खिडकीबाहेर उभा राहून फोटो आणि व्हिडीओ काढत होता. हा प्रकार लक्षात येताच महिलेने आरडाओरड सुरु केली. आरडाओरड ऐकल्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी अशोक चव्हाणला पकडलं आणि नंतर पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.

महिलेने याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कारवाई सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A security guard arrested for taking photos and videos of woman while taking bath in pune sgy

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या