पुण्यातील नवी पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज(मंगळवार) घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी (सुसाईड नोट) देखील आढळून आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, नैराश्यातून आत्महत्या करीत आहे.” असे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. त्रिगुण कावळे (वय 30, सध्या रा. नवी पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिगुण कावळे हा तरुण मुळचा जालना येथील आहे. तो एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यातील नवी पेठेतील राही अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावर मित्रासोबत राहत होता. नेहमीप्रमाणे त्याचे मित्र सकाळीच रूममधून अभ्यासिकेवर गेले होते. दुपारी ते रूमवर आल्यावर रूम बंद होती. आतमधून कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद मिळाली नाही.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्रिगुण कावळे हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला. यानंतर त्याला तातडीने जवळील रूग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A student who appeared for a competitive exam in pune committed suicide by hanging himself msr 87 svk
First published on: 20-09-2022 at 19:56 IST