लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भारतात प्रत्येक मुलाला एक तर क्रिकेटपटू व्हायचे असते नाही तर अभिनेता. त्यानुसार मी सुरुवातीला क्रिकेट खेळायचो. पण, मैदानावर खूप पळायला लागायचे. आपल्याकडून काही होणार नाही हे ध्यानात आल्यावर माझा अभिनयाकडे प्रवास सुरू झाला, अशी टिप्पणी करत प्रसिद्ध अभिनेते-पटकथाकार आणि दिग्दर्शक सौरभ शुक्ला यांनी शनिवारी चक्क मुलाखतकाराचीच फिरकी घेतली. नाटक, चित्रपट हे अनेक कलांच्या मिलाफातून साकारणारे परिपूर्ण व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.

nana patekar s son malhar patekar at rss
अभिनेते नाना पाटेकर पुत्र मल्हारची संघाच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती, काय होते औचित्य
Saif Ali Khan had to take sleeping pills while Hum Saath Saath Hain
‘हम साथ साथ है’च्या शूटिंगवेळी सैफ अली खानला पत्नी अमृताने दिलेल्या झोपेच्या गोळ्या, दिग्दर्शकाने केला खुलासा
aishwarya narkar favorite actor arun sarnaik (1)
ऐश्वर्या नारकर ७० च्या दशकातील ‘या’ मराठी अभिनेत्याच्या आहेत चाहत्या, आवडता चित्रपट अन् गाणं जाणून घ्या…
annu kapoor eknath shinde hamare barah
‘हमारे बारह’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाला धमकी, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कलाकार म्हणाले, “एकनाथ शिंदे या पदावर असेपर्यंत…”
Cannes Film Festival
‘‘…तर भूमिकेचा आत्मा सापडतो’’
Chhaya Kadam Nagraj manjule friendship
“नागराजसारखा माणूस मित्र म्हणून आयुष्यात असावा, कारण…”; अभिनेत्री छाया कदम यांचे वक्तव्य
_Morgan spurlock exposes fast food industry
‘मॅकडोनाल्ड’ कंपनीला दणका देणारे मॉर्गन स्परलॉक कोण होते?
Sriti Jha on people assuming her to be asexual
“मी अलैंगिक आहे का? असा पहिला विचार…”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य; ‘त्या’ कवितेबद्दल म्हणाली, “लोक काय म्हणतील…”

दखनी अदब फाउंडेशनच्या वतीने आयोजित चौथ्या डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन सौरभ शुक्ला यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी शुक्ला बोलत होते. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे, ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, महोत्सवाच्या मुख्य समन्वयिका मोनिका सिंग, पं. रामदयाल शर्मा, शाहीर सुरेशकुमार वैराळवर, सलीम आरिफ, फाउंडेशनचे जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रवी तोमर, युवराज शाह या वेळी उपस्थित होते. ‘सौरभ शुक्ला : एक सुगंधित प्रवाह’ अंतर्गत सलीम आरिफ यांनी सौरभ शुक्ला यांच्याशी साधलेल्या संवादातून अभिनेता, लेखक हा प्रवास उलगडला.

आणखी वाचा-मुंबई-पुणे रेल्वे प्रवांशासाठी गैरसोयीचा शनिवार; ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द

शुक्ला म्हणाले, आई-वडील कलाप्रेमी असल्याने मी लहानपणी महिन्याला किमान दहा चित्रपट पाहायचो. जेव्हा मी अभिनयाचे क्षेत्र निवडले तेव्हा घरातून विरोध झाला नाही. जेव्हा नाटकात काम करायला लागलो तेव्हा नाटकाची भाषा मला समजायला अवघड जायची. किमान स्वत:ला कळावे, या हेतूने पुढे मी नाटक लिहायला लागलो. आता लेखन हे माझ्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले आहे.

आपण लिहिलेल्या शब्दांत अर्थ लपलेले असतात, असे लेखकाला वाटते. पण, तसे असते तर अभिनेत्याची गरजच भासली नसती. लेखक आणि अभिनेत्याची पार्श्वभूमी वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक वेळी लेखकाला अभिप्रेत अर्थ अभिनेत्याला समजला आहे, हे गृहीत धरता कामा नये. तो अर्थ समजविण्याचा आणखी प्रयत्न करणे आवश्यक असते, असे सांगून शुक्ला यांनी ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटातील भूमिकेविषयीचे भाष्य केले.  

ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यावेळी बोलताना म्हणाले, की कोणताही समाज, देश, आणि पर्यायाने विश्व श्रीमंत व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर भाषेचा विचार होणे गरजेचे आहे. कोणत्याही समजाची श्रीमंती ही त्याच्या कलाप्रधानतेवर ठरते. कलेने समाजात सकारात्मकता येते. विकृती आणि नकारात्मक विचार दूर लोटायचे असतील तर कला महत्त्वाचे काम करते. डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलसारख्या बहुभाषिक महोत्सवांची समाजाला गरज आहे.