जळगावातील पाचोऱ्यात आज ( २३ एप्रिल ) उद्धव ठाकरेंची सभा होत आहे. शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार आर.ओ पाटील यांची मुलगी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. या सभेवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी इशारा दिला आहे. आम्ही दगड मारून सभा, आंदोलन उधळून टाकणारी लोक आहोत, असं पाटीलांनी म्हटलं आहे.

गुलाबराव पाटलांच्या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याबद्दल अजित पवारांना पुण्यात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “गुलाबराव पाटील शिवसेनेच्या कुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. शिवसेनेच गुलाबराव पाटलांना आमदार केलं आहे. आता राजकीय परिस्थितीनुसार ते शिंदे गटात गेले आहेत. बोलण्याच्या ओघात लोक वेगवेगळं बोलतात. त्यांना गांभीर्याने घेण्याचं गरज नाही.”

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप

हेही वाचा : संजय राऊतांनी सरकारबाबत केलेल्या ‘त्या’ दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मला…”

“महाराष्ट्रात बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. गारपीट आणि अवकाळीने पिकांचं नुकसान झालं आहे. त्यांना सरकारने नुकसान भरपाई दिला पाहिजे. खरेदी केंद्र बंद झाली असून, ती सुरू केली पाहिजेत. असे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत,” असं अजित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “काम करणारा नेता मुख्यमंत्री झालेला आम्हालाही आवडेल”, अमृता फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर अजित पवार म्हणाले, “मला जर कुणी…”

“खारघरमधील घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र सरकारला लिहिलं आहे. ही मागणी मान्य करायची का नाही? हा राज्य सरकारचा अधिकार आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रम आयोजित करताना निष्काळजीपणा केल्याचं निश्चित झालं आहे. निष्पाप लोकांचा यात मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमासाठी राज्य सरकारने १३ ते १४ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आहे. अधिकाऱ्याने अधिकाऱ्याची चौकशी केल्यावर ती निपक्षपणे होईल, असं वाटत नाही. त्यामुळे न्यायालयीने चौकशीची मागणी केली आहे,” असं अजित पवारांनी म्हटलं.