पुणे : नगर रस्ता भागात बुधवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे वाघोलीतील उबाळेनगर परिसरात एका वाहनावर जाहीरात फलक कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली. या भागातील वीजपुरवठा करणाऱ्या तारेला फलक कोसळल्याने विज पुरवठा खंडीत झाला.

नगर रस्ता भागातील साई सत्यम पार्क परिसरात बुधवारी सायंकाळी जाहिरात फलक कोसळला. या घटनेनंतर वाहतूक कोंडी झाली. पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन जाहिरात फलक हटवला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज पुरवठा कंडीत झाला. खराडी, वडगाव शेरी, शुक्रवार पेठ परिसरात सहा ते सात ठिकाणी झाडे पडली. कसबा पेठ परिसरात एका वाड्याची भिंत कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An advertisement board fell down in wagholi due to strong winds pune print news rbk 25 amy
First published on: 18-04-2024 at 01:01 IST