पेट्रोल-डिझेलसोबतच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात सुरू असलेल्या वाढीमूळ सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यापासून इंधन दरवाढ सुरु आहे. राज्यात पेट्रोल प्रति लिटर १११ रुपये तर डिझेल ९५ रुपये झाले आहे. याचबरबरोबर घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरची किंमत ९५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या विरोधात आज(गुरुवार) पुण्यात बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने चूल पेटवून आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ”केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून सतत दरवाढ करत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. आजवरची सर्वात उच्चांकी दरवाढ झाली असून, या सरकारने नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीनंतर ही दरवाढ केली आहे. यातून सरकारची मानसिकता समजून येत आहे. केवळ निवडणूक काळात दरवाढ केली जात नसेल तर सरकारने सतत निवडणुका घ्याव्यात, जेणेकरून नागरिकांना दिलासा तरी मिळेल. तसेच, केंद्र सरकारने जर वाढती महागाई नियंत्रणात आणली नाही तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन केले जाईल.”, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An agitation by ncp in pune to protest against fuel price hike msr 87 svk
First published on: 24-03-2022 at 11:07 IST