पाळीव प्राण्यांना उपाशी ठेवून त्यांना घरात डांबून ठेवणे एका महिलेला चांगलेच महागत पडले. पुण्यातील कोंढवा परिसरात एका महिलेने २ मांजरी आणि कुत्र्याला साखळीने बांधून ठेवले होते. एवढेच नाही तर त्यांना ३ दिवस उपाशी ठेवले. याप्रकरणी संबंधीत महिलेला कोंढवा पोलिसांनी अटक केली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेनीफर डेन्जील डिसोजा (वय २६, रा. गंगा किंगस्टन फ्लॅट नं. ए.२०३, मंहमदवाडी) असे या महिलेचे नाव आहे.  तिने राहत्या घरी कुत्रा आणि २ मांजराना बांधून ठवले होते. या प्राण्यांना तीन दिवस घरात डांबून जेनीफर कामानिमित्त बाहेर गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राण्यांच्या आवाजावरुन शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. महिलेच्या घरी २ पर्शियन मांजरे आणि १ शेन बर्नाड जातीचे कुत्रे सापडले. जेनिफरने या पाळीव प्राण्यांना साखळीने बांधून ठेवले होते. या प्राण्यांना ३ दिवस जेवण दिले नसल्याचेही समोर आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animals trap in home woman arrested in pune
First published on: 01-08-2017 at 20:07 IST