पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी भोसरीतील स्वयंघोषित गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्याकडून खंडणी घेण्याच्या आरोपाखाली दोघांना अटक केली. अशोक कोतवाल आणि मनोज कोतवाल अशी या दोघांची नावे आहेत. 
फुगे यांची पत्नी सीमा फुगे यांनी नगरसेवक पदासाठी जातीचे बनावट प्रमाणपत्र दिल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल न करण्यासाठी कोतवाल यांनी फुगे यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी ६१ लाख रुपये त्यांनी फुगे यांच्याकडून घेतले होते. त्यानंतरही त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेविका आणि फुगे यांची पत्नी सीमा फुगे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते.