क्रिकेट सामन्यात झालेल्या वादातून युवकाला मारहाण करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. इब्राहिम रांजालाल सुंडके (वय १९, रा. मोमीन मंझिल, घोरपडे पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मुजम्मील नावाच्या आरोपीसह दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इब्राहिम सुंडके याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>>पुणे: महाविद्यालयांमध्ये ४६ हजार नवमतदारांची नोंदणी

Katraj area, cricket, firing,
पुणे : क्रिकेट खेळताना वादातून झाला गोळीबार अन्….
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
IPL 2024 What Was That Thing on MS Dhoni Strapped on His Ankle
IPL 2024: मॅचनंतर धोनीच्या पायाला काय बांधण्यात येतं?

इब्राहिम आणि आरोपी मुजम्मील यांच्यात किक्रेट सामन्या दरम्यान वाद झाला होता. इब्राहिम कोंढव्यातील शाहिन ॲकडमी परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपी मुजम्मील आणि त्याच्या बरोबर असलेल्या दोन साथीदारांनी इब्रााहिमला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. सहायक पोलीस निरीक्षक हरीश शिळमकर तपास करत आहेत.