पुणे : दिवाळीनिमित्त शनिवार-रविवारची सुट्टी व दिवाळीची सुट्टी यामुळे मुंबईकर आणि इतर नोकरदार वर्ग घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे पुण्याच्या दिशेने चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. बोरघाट, उर्से टोल नाका येथे ऐन दिवाळीच्या आधीच वाहतूक कोंडी निर्माण झाल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.