पुणे: पिंपरी- चिंचवडमधील भाजपाच्या महिला आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि उमा खापरे यांनी आज अधिवेशनासाठी एसटी ने प्रवास केला. यावेळी सर्वसामान्य महिलांच्या वतीने दोन्ही महिला आमदारांनी राज्यसरकार चे आभार मानले आहेत. राज्यशासनाने महिलांना एसटी तिकिटाच्या दरात पन्नास टक्के सवलत दिली आहे. यानंतर एसटी प्रवासात महिलांची संख्या वाढली असल्याचं देखील समोर आलं आहे.

भाजपाच्या चिंचवड विधानसभे च्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी एसटी ने लोणावळ्यापर्यंत प्रवास केला. सकाळी साडे नऊ च्या सुमारास दोन्ही महिला आमदार पिंपरीच्या वल्लभ नगर बस स्थानकात आल्या. तिथून शिरूर दादर एसटी ने प्रवास सुरु केला. यावेळी भाजपाच्या महिला कार्यकर्त्या देखील महिला आमदारांच्या सोबत होत्या. त्यामध्ये माजी महापौर उषा ढोरे, स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, निर्मला कुटे, सविता खुळे, वैशाली जवळकर, माधवी राजापुरे, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, माजी शहराध्यक्षा शैला मोळक, दिपाली धानोरकर, सुप्रिया चांदगुडे आदींचा समावेश होता.

engineers doctors applications for police recruitment
पोलीस भरतीसाठी अभियंते, डॉक्टरांसह उच्चशिक्षितांचेही अर्ज
BJP ignores the issues of inflation and unemployment Congress alleges in nashik
भाजपकडून महागाई, बेरोजगारीच्या मुद्यांना बगल; काँग्रेसचा आरोप
Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा

आणखी वाचा- पुणे: तरुणीने प्रेमाचे नाटक करुन पाच लाख रुपये उकळले, तरुणाची आत्महत्या

अश्विनी जगताप यांनी यावेळी एसटी बद्दल बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. लाल परी म्हणजे एसटी ही शालेय आणि कॉलेज जीवनात महत्वाची ठरली. सहलीला जायचं झाल्यास एसटी शिवाय पर्याय नसायचा. आम्ही एसटी ची आतुरतेने वाट पाहायचो अस जगताप यांनी सांगितले. राज्यसरकार ने महिला दिनानिमित्त महिलांना दिलेलं हे गिफ्ट खरच कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील महिला, तरुणींनी एसटी प्रवास करावा असे आवाहन उमा खापरे यांनी केले आहे. दरम्यान, महिला आमदारांनी महिलांना केले आवाहन अगदी बरोबर आहे. परंतु, एसटी ची होत असलेली वाताहत देखील थांबवणे तितकेच गरजेचे आहे. म्हणून भाजपाच्या आमदारांनी देखील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आणखी वाचा- पिंपरी : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर गौतमी पाटीलबाबत म्हणाल्या….अंगभर कपडे घालून लावणीचे सादरीकरण कर!

एसटी प्रवास केल्याबाबत बोलताना आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, अर्थसंकल्पात सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यातून राज्यातील महिला भगिनींना प्रवास करण्यासाठी मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एसटीने प्रवास करून महिलांना दिलेल्या सवलतीच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे महिला प्रवाशांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

आमदार उमा खापरे म्हणाल्या, महिलांना एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. आज आम्ही अधिवेशनाला जाताना पिंपरी ते लोणावळा असा महिला पदाधिकाऱ्यांसोबत एसटीने प्रवास करून महिला प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.