पुणे : ‘मेरा बूथ, संपर्क से मजबू’’ ही घोषणा सत्यात उतरिवण्यासाठी तसेच प्रत्येक बूथ सक्षम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अटलशक्ती महासंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील दीड लाख घरात भाजप कार्यकर्ते जाणार असून किमान सहा लाख नागरिकांशी संवाद साधणार आहेत. संघटन, संपर्क आणि संवाद ही भारतीय जनता पक्षाची वैशिष्टय़े आहेत. देशात सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचिवण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
याअंतर्गत शहरातील तीस हजार कार्यकर्ते सहभागी होणार असून प्रत्येक कार्यकर्ता पाच कुटुंबांशी संपर्क साधणार आहे. एका दिवसात दीड लाख कुटुंबे आणि सहा लाख पुणेकरांशी संवाद साधण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या योजनांच्या माहितीची तसेच महापालिकेकडून राबविण्यात आलेल्या प्रकल्प, योजनांची माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यकत्र्याने त्याच्याकडील यादीतील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची भेट घ्यावी अशी सूचना देण्यात आली असून भेटीची माहिती मंडल अधिकाऱ्याकडे संकलित करण्यास सांगण्यात आले आहे. अभियान संपल्यानंतर मंडलनिहाय कार्यकर्ता मेळावा होणार आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी आणि बूथ सक्षम करण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार असल्याचे भाजप संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर उपाध्यक्ष आणि प्रवक्ता श्रीपाद ढेकणे, संदीप खर्डेकर यांनी सांगितले.