महाराष्ट्राला आर्थिक संकटात आणण्याचा प्रयत्न करून दुसऱ्या बाजूने सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआय, नार्कोटिक चा वापर करून सत्तेत असलेल्या व्यक्तींना संकटात आणण्याच काम भाजप करत असल्याचे राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, ईडी…सीडी, सीबीआय चा वापर केला तरी हे सरकार पाच वर्षे काम करणार असल्याचे यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी शरद पवार म्हणाले की, काय तुमची ईडी,सीडी, सीबीआय वापरायचं ते वापरा महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच सरकार निवडून दिलेलं आहे. किती प्रयत्न केले तरी हे सरकार पाच वर्षे काम करणार. अस ठाम पणे पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले की, दिल्लीतील सरकार ची जबाबदारी आहे की राज्याला शक्ती द्याची, राज्याला मदत करायची, जनता राज्यात असते. मात्र तस होताना दिसत नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. 

पुढे ते म्हणाले की, महागाई चा भडका झाला आहे. पेट्रोल, डिझेल चे दरवाढ झाली आहे. पेट्रोल ची जगात किंमत वाढली हे कारण केंद्राला सांगण्यासाठी होत. पण, जगात किंमत कमी झाली, तरी ही देशात वाढत्याच किंमती ठेवल्या. पुढे ते म्हणाले की, इंग्रजी दैनिकात माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचा एक लेख आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, केंद्रसरकार ने पेट्रोल, डिझेलवर जो कर बसवला आहे त्यातील २५ टक्के कमी केला तर महागाईला तोंड देण्याची परिस्थिती सामन्यांमध्ये निर्माण होईल. मात्र हे सरकार त्यावर विचार करण्यास तयार नाही. असे देखील पवार म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणाले की, दिल्लीतील भाजपाचे सरकार नवीन कारखानदारी काढायला अनुकूल नाही. त्यांची भूमिकाच वेगळी आहे. कारखानदारी, सर्वसामन्याच्या हाताला काम मिळावं ही भूमिका पूर्वीच्या सरकार ची होती. कामगारांच्या अधिकाराच जतन करावं, हे सूत्र त्या पाठीमागचे होते. आज काय आहे? कधी ही कोणाला काढून टाकण्याच्या संबंधी कायद्यात बदल केले जात आहेत. नोकरीमध्ये कँफॉर्ममेशन ही संकल्पना असता कामा नये या संबंधीचा विचार भाजपच्या दिल्लीच्या सरकारमध्ये आहे. ही भूमिका कामगार विरोधी आहे. कामगारांच्या हिताचे रक्षण करत नाहीत. त्यामुळं भाजपला सत्तेत बसण्याचा अधिकार नाही अस पवार म्हणाले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bring ed cd this government will not be removed for 5 years sharad pawar pimpari chinchwad srk 94 kjp
First published on: 17-10-2021 at 19:03 IST