पिंपरी-चिंचवडजवळील घोराडेश्वर येथे एका दिराने भावजयीचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. भावजयीकडे आरोपी दिराने शरीर सुखाची मागणी केली होती. त्याला विरोध केल्याने तिचा गळा दाबून खून केला असल्याचं उघड झाल आहे.  या प्रकरणी आरोपीला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे महिलेशी एकतर्फी प्रेम होते. रविवारी आरोपी महिलेला घेऊन घोराडेश्वर येथे देवदर्शनासाठी डोंगरावर गेला होता. महिलेला पुढे घडणाऱ्या घटनेची काहीच कल्पना नव्हती. निर्मनुष्य आणि दाट झाडीत गेल्यानंतर आरोपीने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, त्याला महिलेने विरोध केला. याचाच राग मनात धरून आरोपीने भावजयीचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केला आणि तेथून धूम ठोकली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brother in law demand for sex from brother wife abn 97 kjp
First published on: 20-09-2021 at 11:29 IST