पुणे : सहकारनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात बेकायदा जमाव जमवून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, महेश बावळे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पोलीस शिपाई अभिजीत वालगुडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आचारसंहितेचा भंग करणे, तसेच बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, महेश वाबळे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि कार्यकर्त्यांनी पद्मवती परिसरात पैसे वाटपाचा आरोप करून सहकारनगर पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या रविवारी (१२ मे) ठिय्या आंदोलन केले होते. भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आराेप त्यांनी केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक शिळीमकर, वाबळे यांच्यासह पदाधिकारी सहकारनगर पोलीस ठाण्यात गेले. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात बेकायदा जमाव जमवून घोषणाबाजी केल्याचे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आचारसंहितेचा भंग, तसेच बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case against bjp farmer mla rajendra shilimkar mahesh bav pune print news rbk 25 amy