पुणे : घर बळकावल्याप्रकरणी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि वानवडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंयज पिंगळे यांच्यासह बाराजणांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला .

याप्रकरणी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे , अरुण भुजबळ (रा. फातिमानगर, वानवडी), विद्या अरुण भुजबळ, प्रशांत पवार, उमेश भुजबळ, सदानंद तेलगू, कांताबाई बंडोबंत लांडगे, राजेंद्र बापुराव सुर्वे, तुकाराम किसन आगरकर, सपना घोरपडे, मनिषा गायकवाड यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध बेकायदा जमाव जमवणे, तसेच न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून घराचा ताबा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Devendra Fadnavis And Sharad Pawar
“देवेंद्र फडणवीस हा एकच बाप भेटला जो शरद पवारांना..”, कुठल्या नेत्याने केलं हे वक्तव्य?
ajit pawar
“मी पक्षाचा संस्थापक सदस्य, अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो”; ‘या’ नेत्याने दिला इशारा
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार

हेही वाचा…पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे वानवडी परिसरात घर आहे. घराच्या मालकीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून १० एप्रिल २०२४ रोजी शिवरकर, पिंगळे यांच्यासह अन्य आरोपींनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आरोपींनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केला. या प्रकरणी महिलेने न्यायालयात तक्रार देऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. वानवडी पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.