पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात गोल्डमॅन म्हणून परिचित असलेल्या सनी वाघचौरेवर पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ तसेच गर्भपात केल्या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोल्डमॅन सनीसह त्याच्या कुटुंबातील इतर चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सनी नाना वाघचौरे (३१) आशा नाना वाघचौरे (५६), नाना वाघचौरे (६०), नीता गायकवाड (३६) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सनी वाघचौरे हा कॉमेडियन कपिल शर्माचा मित्र असून त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्जज कलाकारांसोबत गोल्डमॅन सनीची ओळख असून त्यांच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डमॅन सनी वाघचौरेसह त्याच्या कुटूंबातील इतर सदस्यांनी पत्नीला मारहाण करून, शिवीगाळ करत गर्भपाताची औषधे देऊन गर्भपात केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered against pune goldman sunny waghchaure kjp 91 dmp
First published on: 23-10-2020 at 14:00 IST