पुणे : केंद्र सरकारने ‘देखो अपना देश – पिपल्स चॉइस २०२४’ ही सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत नागरिकांच्या ऑनलाइन मतदानातून देशातील सर्वांत लोकप्रिय पर्यटन स्थळ निवडले जाणार असून, या सर्वेक्षणात शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले आहेत.

युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसा, निसर्ग आणि वन्यजीवन, साहसी उपक्रम अशा विविध प्रकारांतून देशातील सर्वांत लोकप्रिय पर्यटन स्थळाची निवड केली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांचे ऑनलाइन मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Ayodhya Ram Mandir Tourism
विश्लेषण: अयोध्येचे राम मंदिर ठरले ‘गेम चेंजर’, भाविकांमध्ये ५०० पटींनी वाढ; का वाजतोय धार्मिक पर्यटनाचा देशभरात डंका?
palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
How Did Get Name Tulsibaug To Pune Famous Market
Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास
tadoba andhari tiger reserve marathi news, nagzira sanctuary marathi news
Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात

हेही वाचा…सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

निवडलेल्या पर्यटन स्थळाचे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील उच्च शिक्षण संस्थांनी या मोहिमेबाबतची माहिती प्राध्यापक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना त्यात सहभागी होण्याची सूचना युजीसीने दिली आहे. या बाबतची अधिक माहिती https://innovateindia.mygov.in/dekho-apna-desh/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.