पुणे : फळबाजारात आवक कमी झाल्याने चिकू, पेरू, डाळिंबाच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. कलिंगड, खरबूजच्या दरात वाढ झाली असून, पपईच्या दरात घट झाल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – पुणे : पावसाळ्यामुळे मासेमारी बंद; मासळीच्या दरात वाढ

pune vegetable prices marathi news, pune vegetable prices today marathi news
पुणे : अवकाळी पावसाचा फळभाज्यांना फटका; हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात वाढ
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

लिंबांना मागणी वाढल्याने १५ किलोंच्या गोणीमागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. अन्य फळांचे दर स्थिर आहेत. केरळमधून ७ ट्रक अननस, मोसंबी २५ ते ३० टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई २० ते २२ टेम्पो, लिंबे एक हजार ते १२०० गोणी, कलिंगड २० ते २५ टेम्पो, खरबूज १० ते १५ टेम्पो, पेरू ३०० ते ३०० टन प्लॅस्टिक जाळी (क्रेट्स), चिकू एक हजार डाग अशी आवक झाली. कोकणातील हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्यात आला आहे. हापूस आंब्याच्या एक हजार पेटी, तसेच कर्नाटकातील आंब्यांची दोन हजार पेटींची आवक झाली.